Bharat Jodo Yatra : अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसदार ठरला; श्रीजया करणार राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा | पुढारी

Bharat Jodo Yatra : अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसदार ठरला; श्रीजया करणार राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे सध्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत. यांच्याबरोबरच काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनीही भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये राहुल गांधींसोबत जोडलेले एक नवे नेतृत्व म्हणजे अशोक चव्हाण यांच्या मुलगी श्रीजया चव्हाण. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांनी देखील ट्विटवर श्रीजया यांचा व्हिडिओ ट्विट करत, आपल्या राजकीय वारसदर कोण असणार याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

भारत जोडो यात्रेत अग्रस्थानी होत्या श्रीजया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. तमिळनाडूतून महाराष्ट्रातील नांदेड येथील देगलूर येथे ही यात्रा पोहोचल्यानंतर, महाराष्ट्रातील पदयात्रेला सुरूवात झाली. यामध्ये अशोक चव्हाण कुटुंबियांची तिसरी पिढी या यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आली. या यात्रेत अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधी यांच्यासोबत त्या या यात्रेत अग्रस्थानी दिसल्या, त्यामुळेच अशोत चव्हाण यांचा राजकीय वारसदार कोण असणार या चर्चेला यादरम्यान ऊत आला.

बॅरनमध्येही झळकल्या श्रीजया

श्रीजया या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. अद्याप त्या राजकारणापासून दूर होत्या. मात्र भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने त्यांचे राजकारणात लाँचिंग झाल्याचे दिसून आले. भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीजया यांचे नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात बॅरन झळकले होते. त्यानंतर त्या यात्रेत राहुल गांधींसोबत अग्रस्थानी दिसून आल्या आणि त्यांनंतर अशोक चव्हाण यांनी ‘पिल्ल्यांच्या पंखांत जेव्हा बळ येते…’; असे म्हणत श्रीजया यांचा व्हिडिओ ट्विट करत संकेत दिले आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाबाबत बॅनवरवर श्रीजया झळकल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.

अशोक चव्हाण यांनी ट्विट करत दिले संकेत

भारत जोडो यात्रेचा एक व्हिडिओ अशोक चव्हाण यांनी शेअर केला आहे. या यात्रेत श्रीजया या अग्रस्थानी दिसत होत्या. या व्हिडीओमध्ये त्या केंद्रस्थानी दिसत होत्या. या व्हिडिओला चव्हाण यांनी कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ” पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं,..तेव्हा पाखरांना होणारा आनंद, अवर्णनीय असाच रहात असणार” असे म्हणत राजकीय संकेत दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button