

धुळे, पुढारी वृततसेवा : काॅंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वालील भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन झाले. त्यांच्या आगमनाबाबत धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवनजवळ मिठाई आणि फटाके फोडून स्वागत करण्यात आले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दि. 7 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे दाखल झाली. या यात्रेत सामील होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत.
दरम्यान, आज काँग्रेस भवन धुळे येथे भारत जोडो यात्रेच्या स्वागतपर कार्यक्रमाचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आणि फटाके फोडून खा. राहुल गांधी यांचे स्वागत केले.
हेही वाचा