पिंपरी : शिवसेना ही राष्ट्रवादी, काँग्रेसच्या विळख्यात : उदय सामंत यांची टीका

पिंपरी : शिवसेना ही राष्ट्रवादी, काँग्रेसच्या विळख्यात : उदय सामंत यांची टीका

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विळख्यात सापडली आहे. आदित्य ठाकरे यांचा 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय हा त्याचेच प्रतीक असल्याची टीका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. उद्योग मंत्री उदय सामंत हे आज पिंपरी-चिंचवड शहरात सोमवार (दि.7) आले होते. त्या वेळी पत्रकारांनी भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याबाबत विचारले असता सामंत म्हणाले की, जेंव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल, तेंव्हा मी शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, म्हणूनच आघाडीसोबत राहू नये, हीच आमची भूमिका होती.

आता भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. या निमित्ताने शिवसेनेची भूमिका ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचीच आहे, त्यामुळे ते त्यांच्या विळख्यात अडकल्याचे स्पष्ट आहे, अशी टीका सामंत यांनी केली. मी सुद्धा हर हर महादेव चित्रपट पाहिलेला आहे. मला ही त्यातील काही संदर्भ अजून लक्षात आलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट, मालिका अथवा नाटक काढले जातात. त्यांनी महाराजांचे खरे वास्तव दाखवण्याची गरज आहे, असे सामंत म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news