पाच राज्यातील विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर; ५ डिसेंबरला मतदान; ८ डिसेंबरला मतमोजणी | पुढारी

पाच राज्यातील विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर; ५ डिसेंबरला मतदान; ८ डिसेंबरला मतमोजणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवणूक आयोगाने देशातील एक लोकसभा आणि पाच विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक जाहीर केली आहे. येत्या ५ डिसेंबरला या ठिकाणी मतदान घेण्यात येईल. विशेष म्हणजे याच दिवशी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार पार पडणार आहे. पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेल्या मतदार संघातील मतमोजणी हिमाचल प्रदेश तसेच गुजरात सोबतच ८ डिसेंबरला केली जाणार असून याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.

उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, बिहार तसेच छत्तीसगड मध्ये रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.१० नोव्हेंबरला यासंबंधी नोटीफिकेशन जारी केले जाईल. १७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येईल. अर्जांची छानणी १८ नोव्हेंबरला होईल. तर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.

समाजवादी पार्टीकचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा मतदार संघात तर रामपूर विधानसभा मतदार संघातील आमदार आजम खान यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने या मतदार संघातही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

याशिवाय ओडिशातील पदमपुर, राजस्थान मधील सरदारशहर,बिहार मधील कुरहानी तसेच छत्तीसगडमधील अनुसूचित जमातीसाठी राखीव भानुप्रतापपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात येईल.निवडणूक आयोगाने सर्व मतदान संघात पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएम तसेच व्हीव्हीपेट चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुबलक प्रमाणत ईव्हीएम तसेच व्हीव्हीपेट उपलब्ध करवून देण्यात आले असल्याचे आयोगाने दिली आहे.

हेही वाचा

निरेसाठी सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजना; राज्यातील पहिलाच प्रकल्प 

पिंपरी : शहरात कोरोनाचे 23 बाधित रुग्ण, तर, 32 रुग्ण बरे झाले

 नाशिक : वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला

Back to top button