पिंपरी : शहरात कोरोनाचे 23 बाधित रुग्ण, तर, 32 रुग्ण बरे झाले | पुढारी

पिंपरी : शहरात कोरोनाचे 23 बाधित रुग्ण, तर, 32 रुग्ण बरे झाले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे शुक्रवारी (दि. 4) दिवसभरात 23 बाधित रुग्ण आढळले. तर, 32 रुग्ण बरे झाले आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 9 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे.

तर, 136 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे. आज दिवसभरात 485 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 72 हजार 401 रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 68 हजार 357 रुग्ण बरे झाले.

Back to top button