दिल्लीतील हवा अजूनही खराब : बांधकाम, तोडकामांवर बंदी कायम | पुढारी

दिल्लीतील हवा अजूनही खराब : बांधकाम, तोडकामांवर बंदी कायम

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीतील तापमान कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी प्रदूषण मात्र अद्याप कमी झालेले नाही. हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सोमवारी सांगण्यात आले.

हवा गुणवत्ता निर्देशांक तीनशेच्या वर असेल, तर हवा खराब असल्याचे मानले जाते. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील बहुतांश भागात अजूनही हा निर्देशांक तीनशेच्या वर आहे. दुसरीकडे दिल्लीला थंडीची चाहूल लागली असून तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हवा गुणवत्ता समितीने बांधकामे तसेच तोडकामांवर बंदी घातलेली आहे. शेजारी राज्यांमध्ये जाणारा शेतकचरा आणि औद्योगिक कारणांमुळे दिल्लीकरांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा :  

Back to top button