नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिवाळीच्या दुसर्याच दिवशी मंगळवारी दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाची (Delhi Air Pollution) पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली. एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) सकाळी 6 वाजता 323 असलेला एक्यूआय सकाळी 9.30 पर्यंत 353 वर पोहोचला.
301 ते 400 दरम्यान श्रेणीतील एक्यूआय अत्यंत खराब मानला जातो. या श्रेणीतील वातावरणात श्वास घेतल्याने श्वसनाचे विकार होण्याची शक्यता बळावते. हवेतील सरासरी धुळीची (पीएम 2.5) पातळी 319 इतकी मोजली गेली. राज्य सरकारच्या बंदीनंतरही रात्रभर फटाके उडविण्यात आल्याचा हा परिणाम आहे. लागून असलेल्या नोएडा, गुरुग्राम आणि फरीदाबादमध्येही हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. अनेक भागात पाणी फवारले जात आहे. (Delhi Air Pollution)
नोएडा तसेच दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक 401-500 या 'गंभीर' श्रेणीतून केवळ एक पाऊल मागे आहे. ही हवा लोकांच्या आरोग्यांना प्रभावित करू शकते. दिल्लीतील लोधी रोड परिसरातील एक्यूआय मंगळवारी सकाळी 273, गुरुग्रामचा 245 तसेच मथुराचा 322 नोंदवण्यात आला. (Delhi Air Pollution)
'फटाक्यांऐवजी मिठाईवर खर्च करा'
दिल्लीत फटाके फोडण्यावरील बंदीविरोधात दाखल केलेल्या याचिकेनंतर दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मिठाईवर पैसे खर्च करण्यास सांगितले होते, हे येथे उल्लेखनीय!
अधिक वाचा :