Work From home : माझा नवरा खोलीत दुर्गंधी पसरवतो साहेब वर्क फ्रॉम होम बंद करा, पत्नीने लिहले मालकाला पत्र | पुढारी

Work From home : माझा नवरा खोलीत दुर्गंधी पसरवतो साहेब वर्क फ्रॉम होम बंद करा, पत्नीने लिहले मालकाला पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनामुळे सध्या खाजगी कंपन्यांचे काम घरात बसूनच सूरू आहे. वर्क फ्रॉम होममुळे (Work From home) घरी असलेल्या प्रत्येकाची हळूहळू काहीना काही तक्रार येत आहे. अश्याच एका विवाहितेने पतीच्या बॉसला एक पत्र लिहले आहे त्या पत्राची सध्या सोशल मीडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

या पत्रात पत्नीने आपल्या पतीचे वर्क फ्रॉम होम बंद (Work From home)करण्याची मागणी केली आहे. माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर ऑफिसला बोलवून घ्या. बऱ्याच काळापासून सूरू असलेल्या वर्क फ्रोम होममुळे आमच्या नात्यात कटूता येण्याची वेळ आल्याचे पत्नीने म्हटले आहे.

दरम्यान हे पत्र ज्यावेळी सोशल मीडीयावर (social midea) व्हायरल झाले त्यावेळी नेटकऱ्यांनीही घरोघरी मातीच्या चुली असा प्रतिसाद दिला आहे.

हे पत्र एका उद्योगपती ट्विटरवर शेअर केले आहे. ते कॅप्शनमध्ये म्हणतात या पत्राला कसे उत्तर द्यायचे हेच मला समजच नाही. दरम्यान हे ट्वीट सोशल मीडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यानी पोस्ट केलेल्या वेळेपासून ८ हजार जणांनी याला लाईक्स दिली आहे.

पत्नीने पत्रात लिहिले, प्रिय सर, मी तुमच्या कर्मचारी मनोजची पत्नी आहे.

तुम्हाला नम्र विनंती आहे की आता त्यांना कार्यालयातून काम करण्याची परवानगी द्यावी. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ते कोविड प्रोटोकॉलच्या सर्व नियमांचे पालन करेल.

जर ऑफिस मधून काम बराच काळ चालू राहिले, तर नक्कीच आमचे लग्न मोडण्यापासून वाचेल.

मानसिक शांती मिळेल

ती पुढे म्हणाली, हा माणूस दिवसातून १० वेळा कॉफी पितो. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून तिथे दुर्गंधी पसरवत बसलेला असतो.

वारंवार काहीतरी खाण्यासाठी विचारत असतो. तो काम सूरू असताना मध्येच झोपत असतो.

मी रोज दोन मुलांची काळजी घेत असतो अशा परिस्थितीत, मला फक्त तुमचे सहकार्य हवे आहे. जेणेकरून मला माझी ‘मानसिक शांती’ परत येईल.

हे पत्र व्हायरल होताच लाखो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरू केले आहे. काहींनी म्हणाले, पतीला ताबडतोब कार्यालयात बोलावले पाहिजे.

तर काहींनी पतीचा पगार वाढवण्याची सूचना केली. जेणेकरून तो आपल्या पत्नीला मदत करण्यासाठी घरात कॉफी मशीन आणू शकेल.

Back to top button