कृषी, प्रक्रियाकृत खाद्य निर्यातीत वाढ; सहामाहीत ‘अपेडा’ची १३ हजार दशलक्ष डॉलरची निर्यात | पुढारी

कृषी, प्रक्रियाकृत खाद्य निर्यातीत वाढ; सहामाहीत 'अपेडा'ची १३ हजार दशलक्ष डॉलरची निर्यात

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या कृषी तसेच प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाल्याची समाधानकारक आकडेवारी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत या निर्यातीत २५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती वाणिज्य माहिती आणि सांख्यिकी महासंचलानालयाने (डीजीसीआय अँड एस) दिली आहे.

अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात विकास प्राधिकरणाने या काळात १३ हजार ७७१ दशलक्ष डॉलरची निर्यात केली. गतवर्षी याच काळात अपेडाने केलेली निर्यात ही ११ हजार ५६ दशलक्ष डॉलर एवढी होती. चालू आर्थिक वर्षात अपेडाने कृषी तसेच प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी २३.५६ अब्ज डॉलरचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यातील ५८% निर्यात पहिल्या सहामाहीतच पुर्ण झाली आहे, हे विशेष.

प्रक्रियाकृत फळे, भाज्यांच्या निर्यातीत वाढ

डीजीसीआय ऍन्ड एसच्या आकडेवारीनुसार प्रक्रियाकृत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत गेल्या सहा महिन्यात ४२.४२ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. तर ताज्या फळांच्या निर्यातीत ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तृणधान्यांसारखी प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने आणि इतर प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये एप्रिल-सप्टेंबर २०२१ च्या तुलनेते यंदा २९.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासोबातच डाळींच्या निर्यातीत देखील १४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मसूर डाळीच्या निर्यातीत गतवर्षीच्या १३५ दशलक्ष टनाच्या तुलनेत यंदा ३३० दशलक्ष टनांपर्यंत वाढ झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button