पुढारी ऑनलाईन डेस्क : टि-२० विश्वचषक स्पर्धेत आज (दि.३०) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पर्थच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला. लुंगी एनगिडीचा भेदक मारा आणि डेव्हिड मिलरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने हा विजय संपादन केला. (Shoaib Akhtar On Indian Team)
दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर भावुक झालेला पहायला मिळाला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला असता तर पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपूष्टात आले नसते. मात्र, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपूष्टात आले आहे. भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना शोएब अख्तरने एक व्हिडिओ ट्वीट केला. या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तानसाठी भारताला जिंकणे गरजेचे होते. पाकिस्तानचे मरण जवळ आणायचे नव्हते. (Shoaib Akhtar On Indian Team)
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रथम फलंदाजी करत असताना लुंडी एनगिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाने नांगी टाकली. सूर्यकुमार यादव शिवाय इतर कोणीही चांगली खेळी करू शकले नाही. भारताने दिलेल्या १३४ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करत असताना अॅडम मार्करम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार खेळी केली. मार्करम आणि मिलरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजय संपादन केला. (Shoaib Akhtar On Indian Team)