नवज्योत सिंग सिद्धू यांना कारागृहातच राहायचंय! नातेवाईकांना सांगितले यामागील कारण | पुढारी

नवज्योत सिंग सिद्धू यांना कारागृहातच राहायचंय! नातेवाईकांना सांगितले यामागील कारण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : १९८८मधील रोड रेज प्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारे माजी क्रिकेटपटू नवज्‍योत सिंग सिद्धू हे तूर्तास तरी कारागृहातच राहणार आहेत. त्‍यांना पॅरोल ( कैद्‍यांना मिळणारी अभिवचन रजा ) मिळू शकते. मात्र अशा प्रकारे कारागृहातून बाहेर येण्‍यास त्‍यांनी उत्‍सुकता दाखवलेली नाही. पॅरोल का नाकारत आहे, यावर नवज्‍योत सिंग सिद्धू यांना नातेवाईकांना नेमकं कारण सांगितले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू म्‍हणाले, ही तर देवाची इच्‍छा

तुम्‍ही पॅरोलसाठी पात्र आहात. तुमची इच्‍छा असेल तर तुम्‍ही काही काळासाठी कारागृहातून बाहेर जावू शकता, असे सिद्धू यांना कारागृह प्रशासनाने कळवले होते. मात्र सिद्धू यांनी ही सूट घेण्‍यास नकार दिला. याबाबत त्‍यांनी नातेवाईकांना सांगितले की, “माझ्‍या नशीबात ही शिक्षा लिहिली होती. त्‍यामुळेच मला ही शिक्षा भोगावी लागत आहे. ही देवाची इच्‍छा होती. त्‍यामुळे मी पॅरोलची सूट घेणार नाही. शिक्षा पूर्ण करुनच कारागृहाबाहेर येणार आहे.”

२७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी सिद्धू हे मित्र रुपिंदर सिंह संधू यांच्‍यासोबत पटियालाच्या शेरवाले गेट मार्केटमध्ये गेले होते. येथे त्‍यांचा पार्किंगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.सिद्धू यांनी गुरनाम सिंग यांना धक्काबुक्की केली. पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मे २०२२ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने सिद्धू यांना एक वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावली होती. १ हजार रुपयांचा दंडहीठोठावला होता यानंतर त्‍यांची रवानगी पटियाला कारागृहात झाली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू कैदी नंबर २४१३८३ असतील त्‍यांना बॅरक नंबर सातमध्‍ये ठेवण्‍यात आले आहे. कारागृहातील कैद्‍यांना दिवसभरात आठ तास काम करावे लागते. कारागृहात सिद्धू यांना क्लार्कचे काम देण्‍यात आले आहे. सुरक्षेच्‍या कारणास्‍तव त्‍यांना  बॅरकमध्‍येच काम करावे लागेल. त्‍यांना प्रतिदिन ३० ते ९० रुपये वेतन मिळेल. हे पैस थेट त्‍यांच्‍या बँक खात्‍यामध्‍ये जमा होतील,अशी माहिती पटियाला कारागृहातील अधिकार्‍यांनी दिली होती.

हेही वाचा : 

 

 

Back to top button