Kerala Governor : 'विसरु नका, मी तुमची नियुक्ती केली आहे; केरळच्या उद्योग मंत्र्यांना राज्यपालांनी सुनावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील कायदा व उद्योग मंत्री पी. राजीव आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यातील शाब्दिक चकमक सुरुच आहे.( Kerala Governor ) नुकतेच एका कार्यक्रमात पी. राजीव यांनी राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची समीक्षा केली जाईल, असा इशारा दिला. यावर राज्यपालांनीही सडेतोड प्रयुत्तर देत पी. राजीव यांना खडेबोल सुनावले.
केरळमध्ये अज्ञानी लोकाचे राज्य : राज्यपाल
राज्यपाल अरिफ मोहम्मद खान म्हणाले की, मी केलेल्या कारवाईची समीक्षा करणार असे केरळचे कायदा मंत्री म्हणत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची समीक्षा करण्यासाठीच माझी नियुक्ती झाली आहे. . मी त्यांना नियुक्त केले. त्यामुळे
त्यांना घटनेमधील तरतुदीची माहिती नाही असे वाटते. केरळमध्ये अज्ञानी लोकाचे राज्य सुरु आहे.
केरळ बनतो ‘ड्रग’ची राजधानी : राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी बोलताना राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, केरळ राज्य ड्रगची ( अंमली पदार्थ ) राजधानी बनत आहे. आता पंजाबऐवजी केरळ ड्रगची राजधानी होत आहे. कारण राज्य सरकारने दारु विक्रीला प्रोत्साहन देत आहे. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, लॉटरी आणि दारु या दोनच गोष्टीतून आपल्या राज्याच्या विकासासाठी पुरेशा आहेत. ज्या राज्यातील साक्षरतेची टक्केवारी १०० इतकी आहे. अशा राज्याचा महसुलाचा मुख्य स्त्रोत हा दारु आणि लॉटरी असावा हे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
Kerala Governor : नेमका वाद काय?
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळ विद्यापीठातील १५ सदस्यांना बरखास्त करण्याचा आदेश दिला होता. आम्ही राज्यपालांच्या निर्णयाची समीक्षा करु, असे विधान उद्योग मंत्री पी राजीव कुमार यांनी गुरुवार २० ऑक्टोबर २०२२ रोजी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. मी राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करणार आहे. विद्यापीठ एक स्वायत्त संस्था आहे. येथे सर्व कायद्यानेच झाले पाहिजे, असेही ते म्हणाले होते.
- हेही वाचा :
- China : जिनपिंगच सर्वेसर्वा! माजी राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी, पंतप्रधानांसह चौघांची उचलबांगडी!
- दहा किलो सोन्याची झळाळी असलेला महाल!