BRICS : विकसनशील देशांसाठी ‘ब्रिक्स व्यासपीठ’ महत्वाचे : पंतप्रधान मोदी

BRICS : विकसनशील देशांसाठी ‘ब्रिक्स व्यासपीठ’ महत्वाचे : पंतप्रधान मोदी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विकसनशील देशांच्या प्राथमिकतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रिक्स व्यासपीठाचा उपयोग होत राहिल्याने अशा देशांसाठी हा मंच बराच महत्वाचा आहे, असे प्रतीपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी, १३ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून केले.

भारताची उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचे उत्तर उदाहरण जगासमोर आहे. ब्रिक्स संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणे हे माझ्यासह देशासाठी आनंदाची बाब असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. ब्रिक्स देशांकडून बरेच सहकार्य लाभले आहे. कोरोना संकटाकाळात देखील सर्वांनी एकत्रित येवून काम केले. खांद्याला खांदा लावून महारोगराईच्या विरोधातील लढ्याला मजबूत केले, असेही पंतप्रधान त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.

पुढील १५ वर्षांमध्ये 'ब्रिक्स'चे व्यासपीठ अधिक उपयोगी ठरावे याकरिता प्रयत्न करावे लागतील. अशात भारताने आपल्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या संकल्पनेतून या बाबीला देण्यात आलेल्या प्राथमिकतेची प्रचिती येते. 'BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य' ही संकल्पना संमेलनाची आहे. कोऑपरेशन फॉर कंटीन्यूटी, कॉन्साॉलिडेशन अँड कंसेन्सस हेच चार 'सी' ब्रिक्स देशाच्या भागीदारीचे आधार आहे.

ब्रिक्स ने न्यू डेव्हलपमेंट बॅक, एनर्जी रिसर्च कॉरपोरेशनसारख्ये मंच सुरू करण्यात आले आहे. गर्व करण्यासारख्या अनेक बाबी आहेत.पंरतु, आत्मसंतुष्ट होता कामा नये. पुढील १५ वर्षांसाठी ब्रिक्स उपयोगी ठरावी, हे निश्चित करावे लागेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

यावर्षी कोरोना महारोगराईमुळे उद्भवलेल्या स्थितीत देखील ब्रिक्सच्या १५० हून अधिक बैठका तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातील २० मंत्रीस्तरावरील होते.परंपरागत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासह ब्रिक्सच्या अजेंडा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर्षी ब्रिक्स ने अनेक गोष्टी पहिल्यांदाच केल्या. नोव्हेंबर महिन्यात जल संसाधन मंत्री ब्रिक्स फॉर्मेटमध्ये पहिल्यांदा भेटणार आहेत.

ब्रिक्सने (BRICS) पहिल्यांदाच मल्टीलिटरल सिस्टम्सच्या बळकटी तसेच सुधारणेसंबंधी एक स्टॅन्ड घेतला आहे. ब्रिक्स 'काउंटर टेरिरिजम एक्शन प्लॅन' देखील मानण्यात आला आहे. नुकतेच पहिल्या ब्रिक्स डिजिटल हेल्थ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक मदतीने आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरले. नोव्हेंबर महिन्यात जल संसाधनमंत्री ब्रिक्स फॉर्मेटमध्ये पहिल्यांदा एकत्रित येणार असल्याचे ते म्हणाले.

बैठकीला ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मारकोस ट्रोयजो, ब्रिक्स व्यवसाय परिषदेचे अस्थायी अध्यक्ष ओंकार कंवर आणि ब्रिक्स महिला व्यवसाय आघाडीच्या अस्थायी अध्यक्ष डॉ. संगीता रेड्डी यांनी त्यांच्या क्षेत्राशी संबंधित अहवाल सादर करतील.

आपल्या अध्याक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्य क्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी एक्सचेंज प्रोग्रॅम यांचा त्यात समावेश आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त कोरोना  महारोगराईच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाणघेवाण बैठकीतून करण्यात आली.

पहा व्हिडीओ : गणेश चतुर्थी 2021 : अशी करा श्री गणेश प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news