Galaxy pair : NASA च्या हबलने टिपली परस्परसंवादी आकाशगंगांची छबी
पुढारी ऑनलाईन : NASA च्या हबल स्पेस टेलिस्कोपने परस्परसंवादी शेजाशेजारील दोन आकाशगंगेची नेत्रदीपक छबी टिपली आहे. या नाविन्यपूर्ण आणि अनोख्या आकाशगंगेच्या मिळालेल्या छायाचित्रामुळे आनंद व्यक्त करताना, हबलने Happy #HubbleFriday! 🌀 असे ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.
Happy #HubbleFriday! 🌀
The galaxy pair seen here is Arp-Madore 608-333, and despite their calm appearance, the two are actually warping and disrupting one another through a mutual gravitational interaction!
Discover more: https://t.co/HU578bGIhE pic.twitter.com/872F0eS9LJ
— Hubble (@NASAHubble) October 7, 2022
या आकाशगंगेच्या सभोवती सर्पिल हात, तारे आणि इतर आकाशगंगेचे वलय दिसत आहे. या परस्परसंवादी असलेल्या आकाशगंगा Arp-Madore 608-333 या नावाने ओळखल्या जातात. या दोन्हींमध्ये आंतरक्रिया होताना दिसत असून, त्या एकमेकांच्या शेजारी तरंगताना दिसत आहेत. या आकाशगंगेचे छायाचित्र निर्मळ आणि व्यवस्थित दिसत असले तरी, या दोन्ही आकाशगंगा विस्कळीत आणि विकृत आहेत. कारण यामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे परस्परसंवाद होत असल्याने, त्या एकमेकांना सूक्ष्मपणे विचलित करत आहेत. सर्वेक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या हबलच्या प्रगत कॅमेर्याने आकाशगंगेचा संवाद कॅप्चर केला.
What do Hubble & @NASAWebb have in common with these two galaxies? They both look better together – literally!
By combining these telescopes’ observations of the galaxy pair VV 191, astronomers can learn more about the effects of interstellar dust: https://t.co/DS6TwqZO3F pic.twitter.com/G0Bqi2pBBv
— Hubble (@NASAHubble) October 5, 2022
हबलविषयी अधिक जाणून घ्या
हबल दुर्बीण ही अवकाशगंगेचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाशसंस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली आहे. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा: (https://www.nasa.gov/image-feature/goddard/2022/hubble-snaps-a-pair-of-interacting-galaxies)
हेही वाचा:
- Tarantula Nebula : हजारो ताऱ्यांना जन्म देणाऱ्या ‘टॅरंटुला नेबुला’चे छायाचित्र जेम्स वेब टेलीस्कोपने केले कॅप्चर!
- NASA Webb Telescope: ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ने पुन्हा कॅप्चर केली कलरफुल कार्टव्हिल आकाशगंगा (Video)
- अंतराळात दोन आकाशगंगांची होत आहे महाधडक