Tarantula Nebula : हजारो ताऱ्यांना जन्म देणाऱ्या ‘टॅरंटुला नेबुला’चे छायाचित्र जेम्स वेब टेलीस्कोपने केले कॅप्चर! | पुढारी

Tarantula Nebula : हजारो ताऱ्यांना जन्म देणाऱ्या 'टॅरंटुला नेबुला'चे छायाचित्र जेम्स वेब टेलीस्कोपने केले कॅप्चर!

पुढारी ऑनलाईन: नासाच्या जेम्स बेव टेलिस्कोपने हजारो ताऱ्यांना जन्म देणाऱ्या टारेंटयुला नेबुलाचे (Tarantula Nebula) छायाचित्र कॅप्चर केले आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपलेले टारेंटयुला नेबुला हे अतिशय मोठे आणि उष्ण विशाल ताऱ्यांचे घर आहे. नासाने जेम्स वेब टेलीस्कोपचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, टॅरंटुला नेब्युलामध्ये हजारो तरुण तारे आहेत, जे यापूर्वी कधीही दिसले नाहीत. वेब टेलिस्कोपमधून या प्रतिमेत तेजोमेघाची रचना देखील दिसते.

टॅरंटुला नेबुला हे नाव त्याच्या धुळीच्या तंतुंवरून मिळाले. आपल्या आकाशगंगेजवळील हा सर्वात मोठा आणि तेजस्वी तारा बनवणारा प्रदेश म्हणजेच ताऱ्यांचे घर आहे. वेब टेलिस्कोपने कॅप्चर केलेले हे टॅरंटुला नेबुलाचे छायाचित्र (Tarantula Nebula)  हे पहिल्यापेक्षा जास्त स्पष्ट दिसत आहे. याच्या पूर्वीच्या छायाचित्रामध्ये धुळीचे तंतू दिसत होते; पण सध्या समोर आलेल्या छायाचित्रात कोणत्याही प्रकारचे धुळीचे तंतू दिसत नाहीत. इतके ते स्पष्ट दिसत आहे. या टेलिस्कोपने तारकीय नर्सरीची नोंद केली असून, यामध्ये पूर्वीपेक्षा वेगळी माहिती आणि वैशिष्ट्ये समोर आल्याने वैज्ञानिकांच्या ज्ञानातही भर पडली आहे.

161,000 प्रकाश-वर्ष दूर असलेला टॅरंटुला नेबुला, मोठ्या मॅगेलॅनिक क्लाउड आकाशगंगेतील सर्वात मोठा आणि सर्वात तेजस्वी तारा तयार करणारा प्रदेश आहे, अशी माहिती यूएस स्पेस एजन्सी नासाने दिली आहे. ही आकाशगंगा आपल्या आकाशगंगेच्या जवळ आहे. आतापर्यंत सापडलेल्या सर्वात उष्ण आणि सर्वात मोठे ताऱ्यांचे घर (Tarantula Nebula) असल्‍याचे नासाने म्हटलं आहे. आपल्या आकाशगंगेपेक्षा येथे नवीन तारे खूप वेगाने तयार होत आहेत. नासाच्या मते हा प्रदेश आपल्या आकाशगंगेच्या जवळ आहे. त्यामुळे विश्वाच्या भूतकाळाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी याचा अभ्यास करणे सोपे जाणार आहे.

हेही वाचा:

 

Back to top button