NASA Webb Telescope: 'जेम्स वेब टेलिस्कोप'ने पुन्हा कॅप्‍चर केली कलरफुल कार्टव्हिल आकाशगंगा (Video) | पुढारी

NASA Webb Telescope: 'जेम्स वेब टेलिस्कोप'ने पुन्हा कॅप्‍चर केली कलरफुल कार्टव्हिल आकाशगंगा (Video)

पुढारी ऑनलाईन: नासाच्या जेम्सवेब स्पेस टेलिस्कोपने कार्टव्हील गॅलेक्सीची नवीन ईमेज कॅप्चर केली आहे. ज्यामध्ये प्रचंड वेग आणि मोठ्या प्रमाणात धूळ कॅप्चर झाली आहे. यामध्ये अभूतपूर्व विविध रंगाची एक रिंग फिरताना दिसत आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने(ESA) सांगितले आहे की, पृथ्वीपासून सुमारे ५०० दशलक्ष प्रकाशवर्षे लांब स्थित असणाऱ्या दोन आकाशगंगेची टक्कर होऊन बनलेली ही कलरफुल कार्टव्हिल आकाशगंगा आहे.

NASA Webb Telescope captured Cartwheel Galaxy

नासा आणि ईएसएने केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ज्याप्रमाणे आपण तलावात दगड फेकल्यानंतर त्याचे तरंग निर्माण होऊन एकप्रकारे वलय निर्माण होते, त्याचप्रमाणे दोन आकाशगंगेत जोराची धडक होऊन, एका केंद्रापासून दोन वलयांचा हा विस्तार झाला आहे. यामधील लहान पांढरी रींग ही आकाशगंगेच्या केंद्राजवळ स्थित आहे. तर बाहेरील रिंग ही त्याच्या विविध रंगानी ४४० दशलक्ष वर्षापासून विश्वामध्ये विस्तारलेली आहे.

ही कार्टव्हील आकाशगंगा जसजशी बाहेरील बाजूला विस्तारत जाते, तसे त्याची वायूंमध्ये निर्मिती होऊन, यामधून ताऱ्यांची निर्मिती होते. हबल दुर्बिणीने यापूर्वी आकाशगंगेच्या दुर्मिळ प्रतिमा कॅप्चर केल्या होत्या. अशा लहान घुसखोर आकाशगंगा धडकण्यापूर्वी आपल्या आकाशगंगेसारखी हीसुद्धा सर्पिल आकाशगंगा असल्याचे नासा आणि ईएसएने म्हटले आहे.

‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’वर निर्मितीस १० अब्‍ज डॉलर्स खर्च

बिग बँगनंतर या आकाशगंगांची निर्मिती कशी झाली? यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ ही दुर्बीण अंतराळासंबंधीची असंख्य रहस्ये उलगड्यास मदत करणार आहे. या टेलिस्कोपच्या निर्मितीस १० अब्‍ज डॉलर्स इतका प्रचंड खर्च करण्‍यात आला आहे. आतापर्यंत अवकाश निरीक्षणात १०० पट शक्‍तीशाली असणारी या या दुर्बिणीच्‍या निर्मितीला २००५मध्‍ये प्रारंभ झाला होता. मात्र विविध कारणांमुळे निर्मिती रखडली होती. कॅलिफोर्नियामध्‍ये यशस्‍वी चाचणीही झाली होती. त्‍यानंतर कोरोना साथीमुळे याचे काम काही महिने बंद होते. मात्र अखेर याचे यशस्‍वी प्रक्षेपण झाले.

‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’चे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट म्हणचे धुळीच्या ढगांमध्ये लपलेल्या तार्‍यानांही ही दुर्बीण पाहण्यास सक्षम आहे. याशिवाय दीर्घ अंतरावरून येणारे वेव्हलेंथलाही डिटेक्ट करण्यासही ती सक्षम आहे. या टेलिस्कोपला हबलचे ‘अपग्रेडेड व्हर्जन’ मानण्यात येत आहे. ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या मदतीने तार्‍यांच्या जीवन चक्राबाबतही समजून घेणे सोपे होणार आहे. या दुर्बिणीच्या मदतीने अंतराळातील आतापर्यंत न पाहिलेले भाग पाहणे आता शक्य होईल, असा विश्‍वास शास्‍त्रज्ञांनी दुर्बीण प्रक्षेपणावेळी व्‍यक्‍त केला होता.

पाहा व्हिडिओ:

 

Back to top button