कोलकाता ; पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगाल भाजप उपाध्यक्ष आणि खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर आज सकाळ बॉम्बस्फोट झाला. पश्चिम बंगाल भाजप उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर घडलेल्या या घटनेमुळेपरिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यपाल जगदीप धनखड यांनी या घटनेचा निषेध करत राज्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
बॉम्बस्फोट झालेल्यवेळी अर्जुन सिंह हे बाहेरगावी गेले होते. त्यांचे कुटुंबीय घरामध्ये होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अर्जुन सिंह यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेर्याच्या सहाय्याने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाजपने माझ्याकडे भवानीपूरची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीपूर्वी माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, असा आरोप अर्जुन सिंह यांनी केला आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल होणार नाही तसेच दोषारोपपत्रही दाखल केले जाणार नाही. मागील काही प्रकरणांप्रमाणेच पश्चिम बंगाल सरकार हेही प्रकरण दडपून टाकेल, असेही ते म्हणाले.
बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये सुरु असणारा हिंसाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. एका खासदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट होण्याची घटना चिंताजनक आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अर्जुन सिंह हे मूळचे तृणमूल काँग्रेसचे. २००१पासून सलग चारवेळा भाटपारा विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना पश्चिम बंगाल उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली. यानंतर त्यांनी बैरकपूर लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. तेव्हापासून तृणमूल काँग्रेसविरोधातील त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
हेही वाचलं का ?
व्हिडिओ