Jammu And Kashmir Tourism : ‘मोदी है तो मुमकिन है’! काश्मीरमध्ये रेकॉर्ड ब्रेक १.६२ कोटी पर्यटकांनी दिली भेट

Jammu And Kashmir Tourism : ‘मोदी है तो मुमकिन है’! काश्मीरमध्ये रेकॉर्ड ब्रेक १.६२ कोटी पर्यटकांनी दिली भेट
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार द्वारे जम्मू आणि काश्मीर मधून ३७० कलम हटवल्या नंतर तसेच त्याचा राज्याचा दर्जा काढून त्यास केंद्र शासित प्रदेशचा दर्जा देण्यात आला होता. या सर्व बदलांचे सकारात्मक बदल जम्मू काश्मीरमध्ये दिसण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अर्थात मागील ७५ वर्षांमध्ये असे प्रथमच घडले आहे. जानेवारी २०२२ पासून ऑक्टोंबर पर्यंत म्हणजे १० महिण्यात तब्बल १.६२ कोटी पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली आहे. मागली ७५ वर्षांमधील हे सर्वात मोठे रेकॉर्ड मानले जात आहे. (Jammu And Kashmir Tourism)

जानेवारी 2022 पासून सुमारे 1.62 कोटी पर्यटकांनी (Jammu And Kashmir Tourism) जम्मू-काश्मीरला भेट दिली आहे. केंद्रशासित प्रदेश सरकारने गुरुवारी ही माहिती दिली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीर सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने (डीआयपीआर) सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रशासित प्रदेशात या वर्षी पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 240 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर एक दिवसानंतर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

विकास आणि परिवर्तनाची साक्ष (Jammu And Kashmir Tourism)

जवळपास तीन दशकांनंतर काश्मीर पुन्हा लाखो पर्यटकांना (Jammu And Kashmir Tourism) आकर्षित करत आहे. हे काश्मीर पर्यटनाच्या सुवर्णकाळाकडे परत आल्याचे पर्यटन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या वर्षी जम्मू आणि काश्मीरला भेट देणार्‍या पर्यटकांची विक्रमी संख्या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या सर्वांगीण विकास आणि परिवर्तनाची साक्ष देते. जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन हा रोजगाराचा सर्वात मोठा स्रोत आहे आणि जानेवारी 2022 पासून, 1.62 कोटी पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली आहे, जी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये सर्वाधिक आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक मॉडेल्स आणि योजना (Jammu And Kashmir Tourism)

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यासह पुंछ, राजौरी येथील विविध भागात पर्यटनामुळे सर्वाधिक रोजगार निर्माण झाला आहे. गेल्या 70 वर्षांपासून लोक जम्मू-काश्मीरमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची मागणी करत होते. ही लोकप्रिय मागणी पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर ते शारजाह थेट विमानसेवा सुरू केली. पूर्वी श्रीनगर आणि जम्मूहून रात्रीची विमानसेवा नव्हती. पण, आता जम्मूहून श्रीनगरला रात्रीचीही विमानसेवा उपलब्ध आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी इतरही अनेक मॉडेल्स आणि योजना सुरू केल्या जात आहेत. आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून, जम्मू आणि काश्मीरमध्ये 75 ऑफबीट पर्यटन स्थळे देखील विकसित केली जात आहेत. या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत 3.65 लाख अमरनाथ यात्रेकरूंसह 20.5 लाख पर्यटकांनी विक्रमी काश्मीरला भेट दिली. पहलगाम, गुलमर्ग आणि सोनमर्ग सारखी पर्यटन स्थळे तसेच श्रीनगरमधील हॉटेल्स आणि गेस्टहाऊस 100 टक्के फुल्ल असल्याचे दिसून आले.


अधीक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news