Bigg Boss 16 Salman House: जिम ते बेडरूम कसं आहे सलमानचं खास घर? (VIDEO) | पुढारी

Bigg Boss 16 Salman House: जिम ते बेडरूम कसं आहे सलमानचं खास घर? (VIDEO)

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रथमच बिग बॉस 16 या शोमधील (Bigg Boss 16 Salman House) सलमान खानच्या हाऊसचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. बिग बॉस-१६ मध्ये सलमान खान होस्ट म्हणून आहे. सेटवर एक आलीशान घर आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुख-सुविधा आहेत. (Bigg Boss 16 Salman House)

सलमान खानच्या फॅशन डिझायनरने शेअर केला व्हिडिओ

बिग बॉस-१६ ची शानदार सुरुवात झालीय. बिग बॉस हाऊस ग्रँड आहे ज्याची थीम सर्कसवाली आहे. घराच कानाकोपरा पाहायला मिळत असताना आता या शोमध्ये सलमान राहत असलेला आशियाना आहे तरी कसा? तर या शोच्या निर्मात्यांनी घराचा कानाकोपरा दाखवला आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच बिग बॉसमधील सलमान खानचा आशियाना कसा आहे, व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. सलमानच्या गरजेच्या प्रत्येक वस्तू येथे ठेवण्यात आले आहे.

सलमान खानचे हे घर लाकडाने बनवलेले आहे. ही शैली बहुतेक युरोपमध्ये वापरली जाते. त्याच धर्तीवर सलमान खानसाठी बिग बॉसच्या सेटवर एक आलिशान घर तयार करण्यात आले आहे, ज्याचे प्रवेशद्वारावर गवत आहे.

अनेक वर्षांपासून सलमान खानसाठी काम करत असलेल्या डिझायनर अॅशले रेबेलोला बिग बॉसच्या घरात जाता आले. हे घर फक्त सलमान खानला राहण्यासाठी बांधले आहे. जेव्हा तो बिग बॉसच्या शूटिंगसाठी येतो तेव्हा तो या घरामध्ये राहतो.

लिव्हिंग रूम

हे घर एका सुंदर प्रवेशद्वारापासून सुरू होते आणि त्यानंतर त्याची लिव्हिंग रूम दिसते. काळे सोफे आणि सुंदर गालिचे इथे दिसतात.

डायनिंग

या घरात प्रवेश करताच समोरचं डायनिंग दिसते. इथे लाकडाच्या अनेक खुर्च्या आहेत. त्याच्या आजूबाजूचे इंटीरियर डिझाईनही जुळणारे आहे. या फ्रीजसोबतच डस्टबिन आणि अनेक झाडे-झाडेही ठेवण्यात आली आहेत.

जिम

बिग बॉसचा होस्ट सलमान खानसाठी येथे जिम एरियाही बनवण्यात आला आहे. व्यायामासाठीच्या सर्व आवश्यक वस्तू ठेवण्यात आलेआहेत. याशिवाय मोठा सोफाही बसवण्यात आला आहे.

बेडरूम

या बेडरूममध्ये अनेक एसी लावण्यात आले असून सलमान खानचा अतिशय देखणा फोटोही सजवण्यात आला आहे. सोफ्यासोबत एक सुंदर गालिचा आहे आणि अभिनेत्याचे काही कपडे देखील आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashley Rebello (@ashley_rebello)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashley Rebello (@ashley_rebello)

Back to top button