लष्करी सरावादरम्यान टी-90 टँकचा बॅरल फुटून एका अधिकाऱ्यासह दोन जवानांनी प्राण गमावले | पुढारी

लष्करी सरावादरम्यान टी-90 टँकचा बॅरल फुटून एका अधिकाऱ्यासह दोन जवानांनी प्राण गमावले

पुढारी ऑनलाईन : भारतीय लष्करी जवानांच्या T-90 रणगाडा फील्ड फायरिंग सरावादरम्यान टँकचा बॅरल फुटून एका भारतीय लष्करी अधिकाऱ्यासह दोन भारतीय लष्करी जवानांचा मृत्यू झाला. तर यामध्ये आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशातील झाशीजवळील बाबिना कॅन्टोन्मेंटमध्ये आज फील्ड फायरिंग सरावादरम्यान ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेल डागताना ही घटना घडली आणि तांत्रिक कारणामुळे अचानक भारतीय लष्कराच्या T-90 रणगाड्याचा अचानक स्फोट झाला आणि त्यात एका अधिकाऱ्यासह जवान शहीद झाले. तर रणगाड्याच्या चालकासह तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, अधिक तपशील गोळा केला जात आहे. T-90 टँक हा तिसऱ्या पिढीतील रशियन मुख्य युद्ध रणगाडा आहे. असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा:

Back to top button