Thailand massacre : थायलंड हत्याकांड! मुलगा न दिसल्याने त्याने स्वतःसह अनेकांची केली हत्या | पुढारी

Thailand massacre : थायलंड हत्याकांड! मुलगा न दिसल्याने त्याने स्वतःसह अनेकांची केली हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : थायलंड येथील वायव्य प्रांतात लहान मुलांच्या डे केअर सेंटरमध्ये गुरूवारी (दि.६) झालेल्या अंधाधूंद गोळीबारात ३४ जण ठार (Thailand massacre)  झाले होते. हा गोळीबार निवृत्त पोलीस अधिकारी पान्या कमरब (वय३४) याने केला होता. या प्रकरणी थायलंडच्या केंद्रीय अन्वेषण ब्यूरो तपास करत आहे. आरोपी पान्या कमरब आपल्या मुलाला घेण्यासाठी डे केअर सेंटरमध्ये आला होता. तेथे आपले मूल न सापडल्याने तो संतापला. आणि त्याच्याजवळ असलेल्या शॉटगनने त्याने गोळीबार केला आणि चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे.

Thailand massacre पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब संशयित हल्लेखोराचा शोध सुरू केला होता. त्यानंतर थायलंडच्या केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CIB) ने पान्या कमरबला ओळखले. थाई रॉयल पोलिसांना सांगितले की, पान्या कमरबला या वर्षाच्या सुरुवातीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.

गोळाबारात बळी पडलेल्यांमध्ये पान्याची पत्नी आणि सावत्र मुलगा यांचा समावेश आहे. त्यांचा त्याने स्वतःचा जीव घेण्यापूर्वी ठार मारले होते, असे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचा २ वर्षांचा सावत्र मुलगा गुरुवारी डे केअर सेंटरमध्ये दाखल झाला होता. परंतु हल्ला झाला, तेव्हा तो उपस्थित नव्हता, असे स्थानिक पोलीस सांगितले.

पान्या त्याच्या दोन वर्षांच्या मुलाला घेण्यासाठी गेला होता. पण मुलगा तिथे नव्हता. म्हणून त्याने नर्सरीमध्ये गोळीबार करण्यास सुरुवात केली तसेच लोकांना चाकू मारण्यास सुरुवात केली, असे पोलीस प्रवक्ते मेजर जनरल पैसन लुसॉम्बून यांनी सांगितले. थायलंडचे पंतप्रधान, प्रयुथ चान-ओचा यांनी शुक्रवारी दुपारी काही पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेली चार मुले वाचली असून त्यांची प्रकृती चांगली आहे, असे देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button