

नवी दिल्ली : पुढारी डेस्क; समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची प्रकृती (Mulayam Singh Yadav Health Update) अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीकडे कायम लक्ष ठेवून असल्याची माहिती मेदांता हॉस्पिटलने दिली आहे. मुलायमसिंह यादव यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुलायमसिंह यांची प्रकृती बरी नव्हती. आता त्यांचा प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. मेदांता रुग्णालयाकडून मुलायमसिंह यांच्या प्रकृतीविषयी अपडेट्स दिले जात आहेत.
मुलायमसिंह (Mulayam Singh Yadav) यांना यूरिन इन्फेक्शन झाले आहे. त्यांना एक महिन्याआधीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे. त्यांचा रक्तदाबही वाढला होता. डॉक्टर त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मेदांताच्या आयसीयूत हलवण्यात आले होते. (Mulayam Singh Yadav Health Update)
हे ही वाचा :