

Weather Forecast : येत्या ४, ५ दिवसांत राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात आज (दि.७) आणि उद्या (८) जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर ९ ऑक्टोबर रोजी पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत ११ ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. डोंबिवलीमध्ये सकाळपासून ९४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
देशातील अनेक भागात सध्या पाऊस सुरु आहे. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पुढील ३ ते ४ दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. आग्रा, ग्वाल्हेर या भागातून मान्सून माघारी परतला आहे. (Weather Forecast)
हे ही वाचा :