इन्स्टाग्राम फॉलोअर्स लाईक्सच्या नादात दोन तरुणांचा भोसकून खून

 file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत दुहेरी खुनाने धुमाकूळ माजलाय. सोशल मीडियावर इन्स्टाग्राम फॉलोअर्स आणि लाईक्सच्या नादात दोन तरुणांचा खून केल्याचा आरोप एका तरुणीवर आहे. तिने सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स आणि लाईक्सची संख्या वाढवण्यासाठी दोन तरुणांचा खून केल्याची घटना दिल्लीतील भलस्वा डेअरीजवळ घडली. तरुणीने एका तरुणाला चॅलेंज दिले होते की, त्याने आपल्या गल्लीत येऊन दाखवावे. हेच चॅलेंज त्या तरुणाला महगात पडलं. तिचे आव्हान स्वीकारणे तरुणाच्या जीवावर बेतलं. त्याचबरोबर, त्या तरुणासोबत असणाऱ्या १८ वर्षाच्या मित्रालादेखील आपला जीव गमवावा लागला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स अधिक असल्याने हा वाद होता. सोशल मीडियावर भांडण झाल्यानंतर गाजियाबादमधील अर्थला येथील राहणाऱ्या निखिल या तरुणाला तिने आपल्या गल्लीत येऊन दाखवावं, असं चॅलेंज दिलं होतं. त्यावेळी निखिल आपल्या १८ वर्षाचा मित्र साहिलला घेऊन तिच्या गल्लीत पोहोचला होता. यावेळी आधीच आपल्या मित्रांसोबत उपस्थित असलेल्या तरुणीने निखिल आणि साहिलवर चाकूने हल्ला चढवला. यानंतर हल्लेखोर पळून गेले.

देवेश कुमार महल (डीसीपी) म्हणाले- तरुणीने आपल्या मित्रांना रात्री साडे अकरा वाजता बोलावून घेतलं होतं. नंतर त्या तरुणाला बोलावलं. जेव्हा तरुण त्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा चार जणांनी त्याच्यावर चाकून हल्ला चढविला. तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news