

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंबाबाईचाss..उदो उदो! मंडळी गेल्या १० दिवसांत आपण देवीमातेच्या नावाचा असंख्य वेळा जयघोष केला असेल. (Marathi Movie) भक्तांच्या नवसाला पावणारी, संकट काळात धावून येणारी आणि दुष्टांचा संहार करणारी अशी आपल्या देवीमातेची प्रतिमा आपल्या सगळ्यांच्याच मनात कायम वास करून असते. पण सृष्टीच्या कणाकणात वसलेलं देवीमातेचं रूप आपल्याला कधी, कुठे आणि कोणत्या रुपात येऊन भेटेल, याची खरंतर कुणीच खात्री देऊ शकणार नाही. पण असं असलं, तरी देवीमातेची आपल्या भक्तांवर कायम कृपादृष्टी असते, याची मात्र खात्री आपल्याला ठायीठायी पटत असते. येत्या ११ नोव्हेंबरला हाच साक्षात्कार आपल्याला घडवण्यासाठी 'कुलस्वामिनी' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. (Marathi Movie)
अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडनं हा दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सुशीलकुमार अग्रवाल चित्रपटाचे निर्माते आहे. जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. अभिनेत्री चित्रा देशमुख यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहे.