Xiaomi चे ५,५५१.२७ कोटी रूपये जप्त करण्याची ईडीला परवानगी | पुढारी

Xiaomi चे ५,५५१.२७ कोटी रूपये जप्त करण्याची ईडीला परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी Xiaomi india चे ५,५५१.२७ कोटी रूपये जप्त करण्याची परवानगी ईडीला मिळाली आहे. परकीय चलन व्यवस्थापन (FEMA) कायद्यांतर्गत ही कारवाई केली जाणार आहे. ईडीची देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्ती आहे.

देशातील चिनी कंपन्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेत असतानाच आणखी एक मोठी कारवाई केली जात आहे. याआधीही अनेक चिनी अॅपवर सरकारने बंदी घातली आहे. आता परकीय चलन कायद्यांतर्गत अर्ध-न्यायिक प्राधिकरणाकडून शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची बँक खाती जप्त करण्याचा आदेश ईडीला मिळाला आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आदेश असून यानुसार ईडीला निधी गोठवण्याची परवानगी मिळाली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी सांगितले की, परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत सक्षम प्राधिकरणाने Xiaomi इंडियाच्या बँक खात्यांमध्ये ठेवलेले ५,५५१.२७ कोटी जप्त करण्याच्या आदेशाची परवानगी दिली आहे. शाओमी (Xiaomi) ची बँक खाती जप्त करण्याचा ईडीचा आदेश हा परकीय चलन कायद्यांतर्गत अर्ध-न्यायिक प्राधिकरणाने दिलेला आजपर्यंतचा सर्वात मोठा आदेश आहे.

शाओमी ने भारतात २०१४ ला काम सुरू केले होते. या कंपनीने २०१५ पासून मूळ कंपनीला पैसे पाठवण्यास सुरूवात केली. कंपनीनी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून अनधिकृत रीतीने भारताबाहेर ५,५५१.२७ कोटी रूपये परदेशी कंपन्याना पाठवल्याचे तपासात उघड झाले होते. शाओमी भारतातच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांकडून पूर्णपणे बनवलेले हँडसेट खरेदी करत होती. परदेशात असलेल्या कंपन्यांची सेवा घेतली नसतानाही रॉयल्टीच्या नावाखाली कंपनीने ही रक्कम पाठवली. आता ही रक्कम जप्त केली जाऊ शकते.

हेही वाचा :

Back to top button