दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी सिसोदियांच्या निकटवर्तीयाला अटक | पुढारी

दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी सिसोदियांच्या निकटवर्तीयाला अटक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या समीर महेंद्रू याला सक्तवसुली संचलनालयाने बुधवारी अटक केली. या प्रकरणात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा माजी मुख्य अधिकारी विजय नायर याला सीबीआयने याआधी अटक केलेली आहे.

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार समीर महेंद्रू हा इंडो स्पिरिट्स नावाच्या कंपनीचा मालक आहे. अबकारी धोरण बनविण्यात सामील असलेले तसेच अनियमितता करणाऱ्या लोकांना महेंद्रू याने कोट्यवधी रुपये पोहोच केल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. सिसोदिया यांचा सहकारी अर्जुन पांडे याने विजय नायरच्या माध्यमातून समीरकडून हे पैसे घेतले होते. सीबीआयने मंगळवारी नायरच्या ठिकाणांवर छापे टाकले. नायर याला या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानले जात आहे. ठराविक लोकांना मद्य विक्री करणे, कट रचणे आदी आरोपही नायर याच्यावर ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Back to top button