धक्कादायक! काळ्या रंगावरुन हिणवल्यानं पत्नीनं पतीचं गुप्तांग कापलं

दुर्ग (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात एका ३० वर्षीय महिलेने पतीवर कुऱ्हाडीने वार करुन त्याला ठार मारले. पती काळ्या रंगावरुन वारंवार तिला हिणवत होता. या रागातून तिने नवऱ्याला संपवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीने पतीचे गुप्तांगही कापून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमलेश्वर गावात राहणारा तिचा पती अनंत सोनवणी (४०) यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी संगीता सोनवणी हिला अटक केली आहे, असे पोलीस उपविभागीय अधिकारी (पाटण क्षेत्र) देवांश राठोड यांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, पती त्याच्या पत्नीला तू कुरूप दिसतेस म्हणत हिणवत असे. तो तिला काळ्या रंगावरुन वारंवार टोमणे मारत असे. यावरुन दोघांमध्ये यापूर्वी अनेकदा वाद झाला होता. रविवारी रात्री या दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात संगीताने घरातील कुऱ्हाडीने पतीवर हल्ला केला. त्यात त्याचा जागीच त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे सदर महिलेने पतीचे गुप्तांगही कापले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर संशयित महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या पतीला कोणीतरी मारले आहे अशी बतावणी करुन गावकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर पोलिस चौकशीत तिने गुन्हा केल्याचे कबूल केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अनंत सोनवणी याने संगीता हिच्याशी लग्न केले होते. या प्रकरणी महिलेवर कलम ३०२ (खून) आणि आयपीसीच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा :
- Nashik Crime : पतीचा खून करुन फरार झालेल्या पत्नीला अखेर अटक
- घटस्फोटाची मागणी केल्याने पतीने पत्नीला संपवले