केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साधला ग्रामीण जनतेशी संवाद | पुढारी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साधला ग्रामीण जनतेशी संवाद

पाटस: पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील वकील,डॉक्टर,पदवीधर यांना आपल्या क्षेत्रात येत असलेल्या अडचणी समजून घेऊन त्या दिल्ली येथे गेल्यावर सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.  तालुक्याला आर्थिक बळकट करण्यासाठी रेल्वे,रस्ते,शेती पाणी व्यवस्था महत्वाच्या गोष्टी ही सोडवण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री यांनी विविध क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधताना दिले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ह्या भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड तालुक्यातील पाटस येथे शनिवार (दि २४) रोजी आल्या असताना त्यांनी युवा उद्योजक,वकील डॉक्टर,पक्षाच्या पदाधिकारी व जनतेशी सवांद साधला यावेळी त्या बोलत होत्या..

सीतारामन पुढे म्हणाल्या की – दौंड येथे सर्व क्षेत्रातील पदाधिकारी वर्गाने अनेक आपल्या क्षेत्रातील विविध अडचणी येणाऱ्या समस्या मांडल्या आहेत. त्या सर्व सूचनांचे पालन नक्कीच केले करणार आहे. दिल्ली मध्ये गेल्यावर विविध खात्यांच्या मंत्र्यां बरोबर चर्चा करून आपण सांगितलेल्या सर्व गोष्टीवर लवकरात लवकर निर्णय घेऊन समस्या सोडवाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून या समस्या सोडवण्यासाठी मागणी करणार आहे. दौंड तालुक्याचे आपण सांगितलेले महत्वपूर्ण विषय जे अनेक वर्षापसून खितपत पडले आहे ते मार्गी लावले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, भविष्यात पुणे येथील धरणातून शेतीला मिळणारे पाण्याची अडचण निर्माण होऊन जनतेचे आर्थिक गणित बिघडू नये यासाठी दौंड तालुक्याच्या शेतीसाठी धरणाच्या पाणी नियोजन होणे गरजेचे आहे.शेती व पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊन नये यासाठी प्रयत्न सुरू आहे तर पाण्याचे योग्य नियोजन झाले तर शेती पासून मिळणारे आर्थिक उत्पन्न जास्त आहे हे आर्थिक गणित बिघडू नये यासाठी तालुक्याच्या हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे…

तालुक्यातील लोकल रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत मात्र दौंड ते पुणे प्रवास करताना वेळेचे नियोजन नसल्याने व्यासायिक प्रवाशांना अडचण येत असल्याने पुणे ते दौंड गाडी प्रत्येक तासासह वेळेवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दौंड पासून पुणे शहर ६०किमी अंतराचे असल्याने पुणे १० किमी अंतर राहिल्यावर जवळ एक तास अधिक वेळ वाया जात आहे यासाठी महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात झालेल्या चर्चेत या रस्त्यावरील वहातुक कमी करण्यासाठी व भविष्यातील या तालुक्यातुन गेलेल्या पुणे सोलापूर महामार्ग नव्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे..

दौंड तालुक्याला शेती व्यवसायपासून आर्थिक स्रोत जास्त आहे ते आर्थिक भांडवलासाठी व इतर कामासाठी पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे असल्याने तालुक्यातील रेल्वे ,शेतीचे पाणी व पुणे ते सोलापूर जिल्ह्याला जोडणारा तालुक्याच्या लोकांना फायदेशीर ठरणारणार्या पुणे सोलापूर महामार्गाच्या अडचणी व तालुक्याला आर्थिक बळकट करण्याच्या अडचणी आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सांगितल्या

यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,बारामती लोकसभा प्रभारी आमदार राम शिंदे,किसान मोर्चाचे वासुदेव काळे,भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,डॉ आव्हाड,विश्वास अवचट,दादासाहेब केसकसर,यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक,पदवीधारक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या…

या प्रसंगी भाजपचे तानाजी थोरात,डॉ हर्षदा काळे,विधितज्ञ शहा सर यांनी आपल्या क्षेत्रातील अडचणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना मनोगत व्यक्त करताना सांगितल्या आभार साहेबराव वाबळे यांनी मानले.

Back to top button