Maharashtra Weather Forecast | पुढील ४ दिवस पाऊस कायम राहणार, ‘या’ १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी | पुढारी

Maharashtra Weather Forecast | पुढील ४ दिवस पाऊस कायम राहणार, 'या' १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

maharashtra weather forecast : राज्यातील काही भागांत २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २६ सप्टेंबर रोजी परभणी, नांदेड, लातूर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २७ सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या भागासाठी यलो अलर्ट दिला आहे. २८ सप्टेंबर रोजी देखील मराठवाडा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पडला आहे. येत्या २, ३ दिवसांतही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबई आणि शहरात शुक्रवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी पुन्हा हजेरी लावली. सकाळी ७ ते ८ या तासाभरात रावळी कॅम्प येथे सर्वाधिक २८ मिमी तर सायन माटुंगा येथे २१ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व पश्चिम उपनगरातही तासाभरात मुसळधार पाऊस झाला.

मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसाने काल (शुक्रवार) थोडी उसंती घेतली. सकाळी आकाश निरभ्र असल्यामुळे ऊन पडले होते. अधूनमधून पडलेली एखादी सर वगळता संपूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. दरम्‍यान आज (शनिवार) पहाटेपासून पुन्हा पावसाने मुंबईत हजेरी लावली. (Maharashtra Weather Forecast)

हे ही वाचा :

Back to top button