ritooja shinde : प्रेम फक्त पावसातच होणं गरजेचं आहे का?
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री ऋतुजा शिंदेचं (ritooja shinde) अनेक महिन्यांनंतर फोटोशूट पाहायला मिळत आहे. वनपीस ग्रे कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये तिचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत. ऋतुजा शिंदे ही मराठी कला निश्वातील प्रसिध्द चेहरा आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. शशांक साने यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऋतुजाचे हे फोटो पाहयला मिळताहेत. मॉडेलिंगपासून सुरुवात करणारी ऋतुजा चित्रपटात झळकली. तिने मॉडेलिंगसोबत मराठी चित्रपटातदेखील तिने काम केले. (ritooja shinde)
ऋतुजाचा जन्म १८ जुलै, १९९१ रोजी पुणे, येथे झाला. तिने आपले शालेय शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. कॉलेजचे शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. बालपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तिला सर्वात पहिला चित्रपट मिळाला तो ऑनलाईन बिनलाईन. हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार प्रभाकर गायकवाड यांनी केले होते. या चित्रपटात तिची किमया नावाची व्यक्तीरेखा होती. या चित्रपटामध्ये मुक्य भूमिकेत अभिनेता सिध्दार्थ चांदेकर तसेच हेमंत धुमे होते.
उत्तम नृत्यांगना
ऋतुजाला बालपणापासून नृत्याची आवडत होती. तिने कत्थकचे प्रशिक्षणदेखील घेतले आहे. वयाच्या ८ व्या वर्षापासून ती कथ्थक शिकत होती. अनेक नाटकांमध्ये तिने भाग घेतला होता. तसेच एकांकिका स्पर्धेतही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. टर्निंग पॉईंट हे तिचे पहिले नाटक होते. या नाटकातील भूमिकेसाठी तिला अत्कृष्ट अभनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाल होता.
ऋतुजा सोशल मीडियावरदेखील ॲक्टिव्ह आहे. तिने फेसबूकवर काही वेळापूर्वी एक फोटो अपलोड केला आहे. ती या फोटोत प्रतीक्षा करताना दिसतेय. तिने या फोटोला कॅप्शन लिहिलीय-माझ्यासाठी "चिल" म्हणजे टेक ऑफच्या ३ तास आधी विमानतळावर पोहोचणे आणि नंतर माझ्या गेटच्या पलीकडे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बसणे आणि माझी फ्लाईट चुकण्याची चिंता करणे ?
तिने आणखी काही फोटो ३१ ऑगस्टला शेअर केले आहेत. गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर तिने काही फोटो फेसबूकला शेअर केले आहेत. त्या फेसबूक पोस्टमध्ये ती म्हणतेय- काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय ? सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ? तसेच काही वेळापूर्वी तिने #ladakhdiaries असा हॅशटॅग देत काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

