Vehicle Scrapping : वाहन स्क्रॅप करण्यासाठी पोलिस पडताळणीची आवश्यकता नाही, मंत्रालयाची माहिती | पुढारी

Vehicle Scrapping : वाहन स्क्रॅप करण्यासाठी पोलिस पडताळणीची आवश्यकता नाही, मंत्रालयाची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांशी संबंधित असलेल्या नियमांमध्ये (Vehicle Scrapping) काही बदल केले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, आता आरव्हीएसएफला ( RVSF – Registered Vehicle Scrapping Facility) वाहने स्क्रॅप करण्यापूर्वी स्थानिक पोलिसांकडे वाहनांच्या नोंदींची पडताळणी करण्याची गरज भासणार नाही. नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
 
मंत्रालयाने म्हटले आहे की, व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी व्यापार प्रमाणपत्र प्रणाली सुलभ व्हावी यासाठी नवीन नियम (Vehicle Scrapping) करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांमध्ये काही अडचणी आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांना अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत आता नोंदणी नसलेल्या वाहनांनाच ट्रेड सर्टिफिकेट आवश्यक भासणार आहे.
आता व्यापार प्रमाणपत्रासाठी आरटीओ कार्यालयात न जाता वाहन पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. नवीन वाहन स्क्रॅपिंग धोरण १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात आले. या धोरणानुसार वाहनांसाठी 20 वर्षानंतर फिटनेस चाचणीची (इंजिनची क्षमता, इंधन कार्यक्षमता, सुरक्षा मानके यांची चाचणी ) तरतूद आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी १५ वर्षानंतर ती आवश्यक असेल.
 
स्क्रॅप धोरणामुळे देशातील रस्त्यांवरून १५ ते २० वर्षे जुनी वाहने हटवली जातील. तर १५ आणि २० वर्षे जुन्या वाहनांना फिटनेस चाचणी द्यावी लागेल आणि जर ते नियमांत बसत नसतील  त्यांची नोंदणी रद्द करून त्यांना भंगारात पाठवले जाईल. व्यावसायिक वाहनांसाठी १५ वर्षांनंतर, खासगी वाहनांसाठी २० वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ते भंगारात पाठवले जातील. 
हेही वाचलंत का

Back to top button