T20 World Cup : पॉवरप्लेमध्ये कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू द्यायचा? रोहित शर्मा चिंतेत | पुढारी

T20 World Cup : पॉवरप्लेमध्ये कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू द्यायचा? रोहित शर्मा चिंतेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यंदाची स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे असून सर्वच संघांची तयारी जोरात सुरू आहे. विश्वचषकासाठी जवळपास सर्वच देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघ विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन-तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. टीम इंडियाच्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी या दोन्ही मालिका खूप महत्त्वाच्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावतील. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात चार प्रमुख वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

पॉवरप्लेमध्ये चेंडू कोणाकडे असेल?

टी-20 मध्ये पॉवरप्ले ओव्हर्स खूप महत्त्वाच्या असतात. पॉवरप्लेदरम्यान, गोलंदाजाने अचूक गोलंदाजी केल्यास संघाला सुरुवातीपासूनच ताकद मिळते. भारताकडे चार प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत जे पॉवरप्ले ओव्हर्समध्ये गोलंदाजी करून संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतात. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे चार प्रमुख वेगवान गोलंदाज संघात आहेत. (T20 World Cup)

जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी नवीन चेंडूवर विकेट घेण्याच्या बाबतीत प्रभुत्व मिळवले आहे. या दोघांनाही मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला जसप्रीत बुमराहची उणीवही जाणवली. दुसरीकडे युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अलीकडच्या काळात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. हर्षल पटेलबद्दल बोलताना त्याने आयपीएलदरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्टीवर रोहित शर्मा पॉवरप्लेमध्ये कोणत्या गोलंदाजावर भरवसा ठेवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांची जोडी काय असू शकते…

जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार
जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल
जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग
हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार
हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग
भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग

टी 20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

स्टँडबाय प्लेअर

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.

Back to top button