Diabetes Drug : मोठा दिलासा! मधुमेहावरील स्वस्त औषध ‘सीटाग्लिप्टीन’ बाजारात | पुढारी

Diabetes Drug : मोठा दिलासा! मधुमेहावरील स्वस्त औषध ‘सीटाग्लिप्टीन’ बाजारात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने मधुमेहावरील स्वस्त औषध ‘सीटाग्लिप्टीन’ (diabetes drug Sitagliptin) तसेच या औषधांचा इतर मिश्रणांना बाजारात आणले आहे. या औषधाच्या १० गोळ्यांची किंमत ६० रुपयांपर्यंत असेल. विशेष म्हणजे हे औषध जेनरिक औषधांचे दुकान जनऔषधी केंद्रांवर मिळेल. रसायन तसेच खत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फॉर्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाईस ब्यूरो ऑफ इंडियाने (पीएमबीआय) सीटाग्लिप्टीन तसेच इतर मिश्रणांचे नवीन औषध जनऔषधी केंद्रात उपलब्ध करवून दिले आहेत.

सीटाग्लिप्टीन फॉस्फेटच्या ५० मिलीग्रामच्या (एमजी) १० गोळ्या ६० रुपयांमध्ये तर १०० एमजीच्या गोळ्या उपलब्ध आहेत. तर, सीटाग्लिप्टीन आणि मेटफॉर्मिन हरायड्रोक्लोराईडचे ५० एमजी/ ५०० एमजी प्रमाण असलेल्या मिश्रणाच्या १० गोळ्या ६५ रुपयांना तर, ५० एमजी / १००० एमजी मिश्रण असलेल्या गोळ्या ७० रुपयांमध्ये उपलब्ध असतील.

सर्व गोळ्या बाजारात उपलब्ध इतर बड्या कंपन्यांच्या औषधांच्या तुलनेत ६० ते ७० टक्क्यांनी स्वस्त आहेत. मोठ्या कंपन्यांची औषध १० गोळ्या १६२ रुपयांपासून २५८ रुपयांदरम्यान बाजारात विक्री केली जात आहे. सीटाग्लिप्टीन हे औषध पीएबीआयचे सीईओ रवि दाधिच यांनी लाँच केले आहे. है औषध टाईप-२ मधुमेह असलेल्या प्रोढांमध्ये शर्करा नियंत्रित करून जेवण आणि व्यायामासोबत बरेच गुणकारी असल्याचा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. ((diabetes drug Sitagliptin)

हे ही वाचा :

Back to top button