दीड महिन्यात सरकारी बंगला रिकामा करा : सुब्रम्हण्यम स्वामी यांना उच्‍च न्‍यायालयाचे आदेश | पुढारी

दीड महिन्यात सरकारी बंगला रिकामा करा : सुब्रम्हण्यम स्वामी यांना उच्‍च न्‍यायालयाचे आदेश

नवी दिल्ली:पुढारी वृत्तसेवा- पुढील दीड महिन्यांच्या कालावधीत सरकारी बंगला रिकामा करा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांना दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे स्वामी यांना लवकरच सरकारी बंगला सोडावा लागणार आहे.

सुब्रम्हण्यम स्वामी यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ गेल्या एप्रिल महिन्यात संपला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव बंगला काढून घेतला जाऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे एका याचिकेद्वारे केली होती.

दुसरीकडे केंद्र सरकारने स्वामी यांच्या याचिकेला विरोध केला होता. केंद्रातले मंत्री आणि खासदारांसाठी बंगल्याची तरतूद करणे गरजेचे असल्याने स्वामी यांना खासदार नसताना सरकारी बंगला दिला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दीड महिन्याच्या आत स्वामी यांना बंगला रिकामा करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button