अहमदाबाद येथे बांधकाम सुरु असलेल्‍या इमारतीची लिफ्‍ट कोसळून सात कामगार ठार | पुढारी

अहमदाबाद येथे बांधकाम सुरु असलेल्‍या इमारतीची लिफ्‍ट कोसळून सात कामगार ठार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरातमधील अहमदाबाद येथे आज इमारतीची लिफ्‍ट कोसळून सात कामगार जागीच ठार झाले. इमारतीचे बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली.

अहमदाबाद विद्‍यापीठ परिसरात एस्‍पायर -२ इमारतीचे बांधकाम सुरु होते. या इमारतीवरील सातव्‍या मजल्‍यावरील लिफ्‍ट तुटली. या दुर्घटनेत सात कामगार जागीच ठार झाले. या दुर्घटनेबाबत बोलताना अहमदाबादचे महापौर के. जे. परमार यांनी सांगितले की, आज सकाळ साडेनऊ वाजता ही घटना घडली. इमारतीच्‍या बिल्‍डरने ही घटना लवकर उजेडात आणू दिली नाही. त्‍याने साडेअकरा वाजता पोलिसांना याविषयी माहिती दिली. या प्रकरणाच्‍या चौकशीचे आदेश दिले  हेत. या अपघातातील एक व्‍यक्‍ती गंभीर जखमी आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी केले जाईल, इमारतीच्‍या बांधकामाला परवानगीच्‍या नियमांचे उल्‍लंघन झाले आहे का, हेही तपासले जाईल, असेही के. जे. परमार यांनी सांगितले. तसेच या इमारतीमधील करण्यात आलेले नियमबाहय काम पाडण्‍यात येईस, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा :

 

Back to top button