Coal Suggling Case : प. बंगालच्‍या कायदा मंत्र्यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा : कोळसा तस्करी प्रकरणी कारवाई | पुढारी

Coal Suggling Case : प. बंगालच्‍या कायदा मंत्र्यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा : कोळसा तस्करी प्रकरणी कारवाई

कोलकाता : पुढारी ऑनलाईन : कोळसा तस्करी प्रकरणी केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय ) आज पश्चिम बंगालमधील धडक कारवाई केली. ममता बॅनर्जी यांच्‍या मंत्रीमंडळातील कायदा मंत्री मलय घटक यांच्‍या निवासस्‍थानी छापा टाकण्‍यात आला आहे. तसेच कोलकातामध्‍ये सहा ठिकाणी कारवाई करण्‍यात आली आहे. ही सर्व कारवाई मलय घटक यांच्‍याशी संबंधित असून शोध मोहिम सुरु असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

पश्‍चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणी सक्‍त वसुली संचालनालय (ईडी) मलय घटक यांना २ सप्‍टेंबर रोजी समन्‍स बजावला होता. त्‍यांना १४ सप्‍टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्‍याचे आदेश दिले होते. यानंतर सीबीआय धडक कारवाई करत मलय घटक यांची निवासस्‍थानी छापेमारी केली.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button