गणपती तोंडावर असतानाच देवरुखजवळ सापडले १८ गावठी बॉम्ब | पुढारी

गणपती तोंडावर असतानाच देवरुखजवळ सापडले १८ गावठी बॉम्ब

साडवली; पुढारी वृत्तसेवा : देवरुखजवळ सापडले १८ गावठी बॉम्ब : देवरूख नजीकच्या हरपुडे येथील तरूणाच्या घरात तब्बल १८ जिवंत गावठी बाँम्ब सापडल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सुरेश आत्माराम किर्वे (वय-४८रा. हरपुडे, मराठवाडी) या तरूणाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश किर्वे या तरूणाच्या घरात जिवंत गावठी बाँम्ब असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोध व नाशक पथकाला मिळताच या पथकाने बुधवारी हरपुडे येथे दाखल होत सुरेश किर्वे याच्या घरातून ९ हजार रूपये किंमतीचे तब्बल १८ जिवंत गावठी बाँम्ब जप्त केले.

देवरुखजवळ सापडले १८ गावठी बॉम्ब

जिवंत गावठी बॉम्ब बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेऊन मानवी जीवितास तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून सुरेश किर्वे याच्याविरोधात बुधवारी रात्री ११ वा. देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद रत्नागिरी येथील दहशतवाद विरोधी पथकाचे हे. काँ. आशिष शेलार यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत.

दरम्यान, हरपुडे येथील सुरेश किर्वे या तरूणाच्या घरात १८ जिवंत गावठी बाँम्ब सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून सुरेशने हे गावठी बाँम्ब कशासाठी घरात ठेवले होते? याचा पोलीसांनी शोध घेणे आवश्यक आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अनधिकृत धंद्यांवर पोलीसांचे धाडसत्र सुरू झाले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button