IND vs AUS टी 20 सामन्यांचे ‘असे’ होणार लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

IND vs AUS टी 20 सामन्यांचे ‘असे’ होणार लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Australia Tour of India 2022 : आशिया चषक स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे (IND vs AUA). ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. टीम ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार असून मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबरला, दुसरा सामना 23 सप्टेंबरला आणि मालिकेतील शेवटचा सामना 25 सप्टेंबरला खेळवला जाईल. टी-20 विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपला संघ जाहीर केला आहे, मात्र दुसरीकडे भारताने संघ जाहीर केलेला नाही.

अहवालानुसार, भारतीय निवड समिती टी 20 विश्वचषक स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेसाठी एकाच वेळी संघाची घोषणा करणार असल्याचे समजते आहे. भारताने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना टी-20 मालिका खेळली होती. ज्यात भारताने 2-1 ने ती मालिका जिंकली होती. टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने अगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत दोन्ही संघ अशा खेळाडूंना आजमावतील जे टी-20 विश्वचषक स्पर्धेतही खेळतील. भारताच्या या दौऱ्यावर डेव्हिड वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे.

IND vs AUS T20 मालिका पूर्ण वेळापत्रक

पहिला टी 20 सामना : पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली : वेळ -7:30 PM
दूसरा टी 20 सामना : विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर : वेळ – 7:30 PM
तीसरा टी 20 सामना : राजीव गांधी आंतराष्टीय स्टेडियम, हैदराबाद : वेळ – 7:30 PM

भारतात (Live Telecast and Live Streaming Details) टी 20 सामन्यांची मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल. तसेच Disney+ Hotstar वर ही पाहत येणार आहे.

भारता विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ असा :

ॲरोन फिंच (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, अॅश्टन एगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news