आम्‍ही काँग्रेसचे भाडेकरु नाही, हिस्‍सेदार : आझाद यांच्‍यानंतर आणखी एका नेत्‍याचा नाराजीचा ‘सूर’ | पुढारी

आम्‍ही काँग्रेसचे भाडेकरु नाही, हिस्‍सेदार : आझाद यांच्‍यानंतर आणखी एका नेत्‍याचा नाराजीचा 'सूर'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आम्‍हाला कोणाचाही प्रमाणपत्राची गरज नाही. मी गेली ४२ वर्ष या पक्षासाठी दिले आहेत. ज्‍यांनी पक्षश्रेष्‍ठींना पत्र लिहले यांनी माझ्‍यापेक्षाही अधिक काळ पक्षाला दिला आहे. आम्‍ही या संस्‍थेतील भाडेकरु नाही तर ह्‍स्‍सिेदार आहोत. तुम्‍ही आम्‍हाला पक्षातून धक्‍के काढून बाहेर काढाल तेव्‍हा पाहता येईल, अशा शब्‍दात काँग्रेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी पक्ष श्रेष्‍ठींवर नाराजी व्‍यक्‍त केली आहे. गुलाब नबी आझाद यांच्‍या राजीनाम्‍यावर बोलताना त्‍यांनी आपल्‍या मनातील खदखद व्‍यक्‍त केली.

मनीष तिवारी यांनी म्‍हटलं आहे की, ” गुलाम नबी आझाद यांनी दिलेल्‍या राजीनाम्‍यावर मी भाष्‍य करणार नाही. त्‍यांनी पाठवलेल्‍या पत्रात कोणते दोष आणि गुण आहेत हे मला माहित नाहीत. आमच्‍यातील २३ जणांनी दोन वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांना पत्र पाठऐले होते. काँग्रेस पक्षाची स्‍थिती चिंताजनक असून याला गांभीर्याने घेण्‍याची वेळ आली आहे, असे या पत्रात नमूद करण्‍यात आले होते.”

दोन्‍हींपैकी एकाने वेगळा विचार सुरु केला आहे

२३ जणांनी पत्रामधून पक्षाच्‍या वर्तमान स्‍थितीबद्‍दल भाष्‍य केले होते. या पत्रानंतर काँग्रेस पक्षाने सर्व विधानसभा निवडणुकीत पराभव पाहिला. काँग्रेस पक्ष आणि भारत एकसारखाच विचार करत असतील तर दोन्‍हींपैकी एकाने वेगळा विचार सुरु केला आहे. मला असे वाटते की, २० डिसेंबर २०२० रोजी सोनिया गांधी यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या बैठकीत विविध प्रश्‍नांवर मार्ग काढण्‍याबाबत सहमती झाली असती तर पक्षाचा श्रेष्‍ठ नेता पक्षा सोडून गेला नसता, असा टोलाही मनीष तिवारी यांनी लगावला.

हेही वाचा : 

 

Back to top button