Whatsapp Feature : तुम्हाला तुमचं ऑनलाइन स्टेटस हाइड करता येणार, येतंय व्हॉट्सॲपचं नवीन फिचर

Whatsapp Feature : तुम्हाला तुमचं ऑनलाइन स्टेटस हाइड करता येणार, येतंय व्हॉट्सॲपचं नवीन फिचर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी एक महत्त्वाचे फिचर लवकरच आणत आहे. यूजर्स इंटरफेस वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्याला व्हॉट्सॲप एक नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. अलीकडील यूजर्सच्या गोपनियतेची गरज लक्षात घेत कंपनीने तीन नवीन फिचर्सची घोषणा केली होती. यामध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करणे, कोणालाही माहित न होता गुपचूप ग्रुप सोडणे आणि ऑनलाइन स्टेटस लपवणे या फिचर्सचा समावेश आहे. हे तिन्ही फिचर्स अंतिम टप्प्यात असून, महिन्याच्या अखेरीस यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. परंतु अद्याप याबद्दच्या तारखेसंदर्भात स्पष्टता नाही.

या तीनपैकी ज्या फिचरची युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे Online Status Hide फिचर. हे फिचर सुरू केल्यानंतर, तुम्ही ऑनलाइन असाल आणि  तुम्हाला वाटत असेल कोणी पाहू नये, तर तुम्ही ते लपवू शकणार आहात. हे फिचर सर्वप्रथम अँड्रॉइड आणि आयओएस बीटा यूजर्ससाठी आणले जाण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सॲप डेव्हलपमेंट साइट WaBetaInfo नुसार, कंपनी हे फिचर वेब यूजर्सच्या सेवेत आणण्यासाठी काम करत आहे. ऑनलाईन स्टेटस हाइड फीचर आणण्यामागचा उद्देश हा आहे की, ज्या यूजर्सना त्यांची ऑनलाइन उपस्थिती खासगी ठेवायची आहे. त्यांना हे फिचर सुरु केल्यानंतर मोठा दिलासा मिळणार आहे. कंपनी ऑगस्टच्या अखेरीस हे फिचर जारी करू शकते.

Online Status Hide फिचरचे सेटींग

सर्वप्रथम, व्हॉट्सॲप उघडा.

त्यानंतर सेटिंग या पर्यायावर जा.

सेटिंगमध्ये तुम्हाला अकाउंटचा पर्याय मिळेल.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Privacy या पर्यायावर क्लिक करताच Who can see when I'm online हा पर्याय दिसेल.

या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर, Everyone OR Same as last seen यामधील एक पर्याय निवडता येणार आहे.

यामधील तुम्ही दुसरा पर्याय निवडल्यास, तुम्ही WhatsApp वर ऑनलाइन आहात की नाही हे कोणाही पाहू शकणार नाही.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news