रेल्वे भरतीत गैरप्रकार : त्याने चक्क स्वत:च्या अंगठ्याची त्वचा डम्मी उमेदवाराला चिकटविली अन्… | पुढारी

रेल्वे भरतीत गैरप्रकार : त्याने चक्क स्वत:च्या अंगठ्याची त्वचा डम्मी उमेदवाराला चिकटविली अन्...

बडोदा (गुजरात) : पुढारी ऑनलाईन डेस्क : बडोद्याततील एका डम्मी उमेदवाराला परिक्षेला बसवण्यासाठी चक्क खऱ्या उमेदवारांने स्वत: च्या अंगठ्याची त्वचाच त्याच्या अंगठ्यावर चिकटवली आहे. भारतीय रेल्वेने २२ ऑगस्टला भरतीसाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेत हा प्रकार उघडकीस आला आहे. याबातची माहिती अशी की, बडोद्यातील लक्ष्मीपुरा भागात एक डम्मी उमेदवार भारतीय रेल्वेची प्रवेश परीक्षा देत असल्याचे निदर्शास आले. या उमेदवारांने खऱ्या उमेदवाराच्या अंगठ्याची त्वचाच त्याच्या अंगठ्यावर चिकटवली होती. यासाठी त्याने डिंकाचा वापर केला होता. या उमेदवाराला पर्यवेक्षकांनी दोन-तीन वेळी सॅनिटायझरने हात धुवायला लावल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. डम्मी उमेदवार मनीषकुमार शंभूप्रसाद हा खरा उमेदवार राज्यगुरू गुप्ता यांच्या जागी परीक्षा देत होता. यानंतर बडोदा पोलिसांनी डम्मी आणि खऱ्या उमेदवार दोघांना अटक केली आहे. दोघांनाही कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावली. (रेल्वे भरतीत गैरप्रकार)

भारतीय रेल्वेने २२ ऑगस्टला ही परिक्षा घेतली होती. यावेळी खरा उमेदवार राज्यगुरू गुप्ता याने एका हॉट प्लेटवर त्याचा अंगठा ठेवला आणि त्वचा बाहेर काढली. यानंतर ती त्वचा डम्मी उमेदवार मनीषकुमार शंभूप्रसाद याच्या अंगठ्यावर चिकटविली आणि तो परिक्षा केंद्रावर पोहोचला. यावेळी टीसीएस कंपनीतर्फे अखिलेंद्र सिंग यांना पर्यवेक्षकाचे काम पाहत होते. यांनी स्कॅनिंग डिव्हाईसच्या मदतीने उमेदवांराची तपासणी केली. यावेळी मनीषकुमार शंभूप्रसाद यांची अनेक वेळा तपासणी करावी लागली. यानंतर पर्यवेक्षकाला संशय आल्यानंतर त्याने मनीषकुमारचे दोन- तीन वेळा सॅनिटायझरने हात धुतले. यावेळी त्याच्या अंगठ्यांची त्वचा वेगळी झाली. यानंतर पर्यवेक्षकांने याबाबतची तक्रार वरिष्ठासह पोलिसांत केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना खरा उमेदवार राज्यगुरू गुप्ता यांची डीएनए (DNA) टेस्ट करून ही त्वचा त्याचीच असल्याचे निष्पन्न केले आहे. तर जस्मिमकुमार गज्जर यांनी परिक्षेतील या गैरप्रकाराबाबत मनीषकुमार आणि राज्यगुरू यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४१९,४६४,४६५ आणि १२० या कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोघांना न्यायाल्यात हजर केले असून कारागृहात पाठविले आहे. (रेल्वे भरतीत गैरप्रकार)

हेही वाचलंत का? 

 

Back to top button