हवाला प्रकरणात अडकलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पत्नी पूनम यांना जामीन | पुढारी

हवाला प्रकरणात अडकलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पत्नी पूनम यांना जामीन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हवाला प्रकरणात अडकलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पत्नी पूनम यांना अव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणातील अजितकुमार आणि सुनीलकुमार जैन नावाच्या दोन आरोपींना न्यायालयाने याआधीच जामीन दिलेला आहे.

सत्येंद्र जैन यांना दिल्ली विधानसभा तसेच मंत्रिमंडळातून अयोग्य घोषित केले जावे, अशा आशयाची विनंती याचिका अलिकडेच न्यायालयाने फेटाळून लावली होती. कोरोनामुळे बुध्दीभ्रम झाला असल्याचा युक्तिवाद जैन यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.

बुध्दीभ्रम झाला असेल तर आमदार आणि मंत्री म्हणून जैन कसे काय काम करु शकतात, असा युक्तिवाद न्यायालयात त्यावेळी करण्यात आला. हवाला प्रकरणात सत्येंद्र जैन यांच्या पत्नी पूनम यांनाही तपास संस्थांनी आरोपी केलेले आहे. या प्रकरणातील अंकुश आणि वैभव जैन नावाच्या दोन आरोपींच्या जामिनावर 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे सत्येंद्र जैन यांचा जामीनअर्ज मात्र अद्याप मंजूर झालेला नाही.

हेही वाचा 

Back to top button