Nikki Tamboli : साऊथची अभिनेत्री निक्की तांबोळी म्हणाली, “आउट साइडर असल्याने…” | पुढारी

Nikki Tamboli : साऊथची अभिनेत्री निक्की तांबोळी म्हणाली, "आउट साइडर असल्याने..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री निक्की तांबोळी ( Nikki Tamboli ) सलमान खानच्या रिॲलिटी शो ‘बिग बॉस १४’ मध्ये दिसली होती. या शोमधून तिला खूप लोकप्रियताही मिळाली. निक्की तिच्या फॅशनसेंन्स आणि हॉट लूकने नेहमी चर्चेत असते. निक्की बॉलिवूडमध्ये आपला अभिनयाचा ठसा उमटवण्यास उत्सुक असून, तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आपले मत मांडले आहे.

अभिनेत्री निक्की तांबोळीने ( Nikki Tamboli ) नुकतेच दिलेल्या मुलाखतीत आउट साइडर (बाहेरची व्यक्ती) असल्याबाबतचा खुलासा केला आहे. यात तिने ‘बॉलिवूड इंडस्ट्रीत मी नाही हे माझ्यासाठी चांगले आहे. आउट साइडर असल्याने मला अधिक अधिकार मिळाले आहेत असे मानते. आयुष्यात मी स्वत: निश्चितपणे लंबी रेसचा घोडा बनले आहे. जर तुम्हाला फिल्मी जगतात एखादे ध्येय साध्य करायचे असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नसतो. यात जर तुम्ही आउट साइडर असल्यास तुमच्याकडे कोणताही बॅकअप नसतो. यावेळी तुमच्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे, कठोर मेहनत घेणे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कठोर मेहनत घेवूनच त्याचे ध्येय साध्य केल्याचे तिने म्हटले आहे.

घराणेशाहीला हा मूर्खपणा आहे

घराणेशाहीवर बोलताना  निक्की म्हणाली, “बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. घराणेशाही हा मूर्खपणा आहे. हा प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतो. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर अनेकवेळा बॉलिवूडमध्ये चित्रपटाची पार्श्वभूमी असलेल्यांना संधी देत असल्याचा आरोप केला जातो. तर फिल्मी जगताशी संबंध नसलेले अनेक स्टार्स बॉलिवूडमध्ये बाहेरच्या व्यक्तींना संधी न दिल्याबद्दल दिग्दर्शक आणि निर्मात्याकडे तक्रार करताना दिसतात.”

‘झलक दिखला जा १०’ हा रिॲलिटी शो ३ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. यासाठी निक्की तांबोळीला निर्मात्यांनी संपर्क केला आहे. मात्र, निक्कीने शो करण्यास नकार दिला आहे. ती सध्या मोठ्या प्रोजेक्टची वाट पाहात आहे.

हेही वाचा : 

Back to top button