मातीतील नैसर्गिक 'सोनं' मानल्या जा‍‍णाऱ्या आरोग्यदायी रानभाज्या... | पुढारी

मातीतील नैसर्गिक 'सोनं' मानल्या जा‍‍णाऱ्या आरोग्यदायी रानभाज्या...

सध्या हायब्रीड भाज्या बाजारपेठेत १२ महिने उपलब्ध होत असतात. परंतु वाढत्या आरोग्याच्या प्रश्नांमुळे नागरिकांचा सेंद्रीय भाज्यांकडे कल वाढू लागला आहे. त्यामुळे सेंद्रीय भाजीपाला पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. या भाज्यांना मागणीही मोठ्या प्रमाणात असते. तर श्रावण महिना आणि रानभाज्या हे पूर्वापार चालत आलेलं समीकरण. आजही विशेषत: ग्रामीण भागात जपले जाते. रानभाज्यांची शेती किंवा निगा न करता या भाज्या निसर्गत:च उगवलेल्या असतात. जंगलात, रानात, शेतांच्या बांधावर, माळरानात या भाज्या लागवड न करता उगवून येतात. यावर कोणत्याही प्रकारची कीटकनाशके, खते, औषधे मारली जात नाहीत. नैसर्गिकपणे वाढ होत असल्याने या भाज्यामध्ये खनिजे, मूलद्रव्य, पोषणद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे या भाज्या आरोग्यासाठी वरदान ठरत असून, औषधी गुणांनी युक्त असल्याने लोकांचे आरोग्यही चांगले राहते. अशाच काही रानभाज्यांची आपण ओळख करून घेऊया…

कुर्डूची भाजी 

पावसाळ्यात कुर्डूची भाजी बांध, पायवाट, मोकळी व पडीक जमीन, जंगल अशा ठिकाणी आपोआप उगवून येते. माठवर्गीय कुळात मोडणारी ही अतिशय रुचकर व बहुऔषधी गुणांनी युक्त रानभाजी आहे. बारीक व तांबूस खोडाला गोलाकार आकाराची पाने येतात. ही रानभाजी कोवळी असताना जास्त रुचकर लागते. कुर्डूच्या कोवळ्या पानांचे तुरे भाजीसाठी वापरतात. खुडून आणलेली कुर्डूची भाजी धुवून चिरतात. पातळ व सुकी अशा दोन्ही पद्धतीने शिजवलेली कुर्डूची भाजी चविष्ट लागते. कुर्डुच्या काळ्या बिया मूतखड्याच्या आजारावरही अतिशय गुणकारी आहे. कुर्डुची भाजी आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

अळू

बेसनचे पीठ घालून अळूच्या वड्या केल्या जातात.

अंबाडी

आंबुशी

आघाडा

करटोली

काटेमाठ

कुडा

चिवळ

टाकाळा

दिंडा

पाथरी

शेवगा

भुई आवळी

 

रानभाज्या करताना कोणती काळजी घ्यावी –

रानभाज्या कुठे मिळतात, रानभाज्यांची कशा पध्दतीने भाजी, पातळभाजी करतात, याची पुरेशी माहिती अनेकांना नसते. त्यामुळे रानभाज्यांकडे कानाडोळा गेला जातो. त्यामुळे रानभाज्यांची ओळख जानकारांकडून करून घ्याव्यात. ज्या भाज्यांना पाने मोठ्या प्रमाणात असतात. या भाज्या पहिल्यांदा गरम पाण्यात उकळून त्यानंतर पाणी टाकून द्यावे. त्यानंतरच भाजी बनविण्यासाठी घ्यावी. यामुळे रानभाज्यांमधील अंगभूत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या असतात. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके फवारलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही. उकडून केलेल्या भाज्यांमध्ये शक्यतो कमी मसाले, तेलाचा वापर केल्यामुळे भाज्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.

काही रानभाज्या शीत तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, पोटदुखी, दमा, संधिवात, मधुमेह आदीसह पावसाळ्यातील आजारावर रानभाज्या उपयुक्त आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. या भाज्यांमध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने भाज्यांचा समावेश पावसाळ्याच्या दिवसांत आहारात केल्यास आरोग्यदायी फायदे मिळण्यास मदत होते.

– अनिल  चौगुले, रानभाज्याचे अभ्यासक

Back to top button