बीएस – 6 वाहनांमध्ये सीएनजी, एलपीजी किट बसविण्यास केंद्राची परवानगी | पुढारी

बीएस - 6 वाहनांमध्ये सीएनजी, एलपीजी किट बसविण्यास केंद्राची परवानगी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: बीएस – 6 श्रेणीच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये सीएनजी तसेच एलपीजी किट बसविण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. उत्सर्जनाच्या मापदंडास अनुरुप असे रिट्रोफिटमेंट किट सदर वाहनांमध्ये बसविले जाऊ शकतात, असे सरकारने आदेशात म्हटले आहे. आतापर्यंत बीएस – 4 श्रेणीच्या वाहनांमध्येच किट लावण्यास सरकारची अनुमती होती.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे असंख्य वाहनधारकांनी सीएनजी आणि एलपीजी इंधनाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. सीएनजी आणि एलपीजी हे पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त पडते. त्यातच आता बीएस – 6 श्रेणीच्या वाहनांत किट बसविण्यास परवानगी मिळाल्याने अशा श्रेणीतील वाहने असणाऱ्यांचा ओघ सीएनजी-एलपीजी किटकडे वाढला, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

बीएस – 6 वाहनांत किट बसविण्यासंदर्भात रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. साडेतीन टन वजनाच्या बीएस – 6 पेट्रोल आणि डिझेल कारमध्ये सीएनजी, एलपीजी रिट्रोफिटमेंट किट बसविता येईल. वाहन मालकाला त्याचे वाहन जिथे नोंदणीकृत केलेले आहे, त्याठिकाणी यासाठी आरटीओची परवानगी घ्यावी लागेल, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आलेले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button