बंगळूर : भीषण अपघातात आमदारांचा मुलगा-सुनेसह ७ जणांचा मृत्‍यू | पुढारी

बंगळूर : भीषण अपघातात आमदारांचा मुलगा-सुनेसह ७ जणांचा मृत्‍यू

बंगळूर : पुढारी ऑनलाईन; बंगळूर येथे झालेल्‍या भीषण अपघातात तामिळनाडूमधील आमदार वाय. प्रकाश यांच्‍या मुलासह सात जणांचा मृत्‍यू झाला. आज पहाटे भरधाव कार खांबाला धडकल्‍याने ही दुर्घटना घडली.

सहा जण जागीच ठार

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तामिळनाडूमधील होसूर मतदारसंघातील आमदार वाय. प्रकाश यांचा मुलगा करुणा सागर, सून बिंदू व अन्‍य सहा जण ऑडी कारने जात होते.

भरधाव वेगात असणारी कार बंगळूरमधील मंगला कल्‍याणनमटप्‍पा परिसरात  एका खांबाला धडकली. कारमध्‍ये एकुण चार पुरुष व तीन महिला होत्‍या.

ही धडक एवढी भीषण होती की, कारचा चक्‍काचूर झाला.

सहा जण जागीच ठार झाले. तर एकाचा रुग्‍णालयात उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला.

मृतांमध्‍ये एक जण केरळमधील असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का ? 

Back to top button