हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार; रेल्वेपूल पत्यांसारखा कोसळला; पहा व्हिडिओ | पुढारी

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार; रेल्वेपूल पत्यांसारखा कोसळला; पहा व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उत्तर भारतात ढगफुटी झाल्याने अनेक शहरे पाण्याखाली बुडाली आहेत. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात चक्की नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यामुळे पठाणकोटजवळ रेल्वेपूल अक्षरशा पत्यांसारखा कोसळला. नदीला आलेल्या या पूरातून हा कोसळलेला पूल वाहून गेला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

तिघांचा मृत्यू, डझनभर बेपत्ता

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. पावसाशी संबंधित घटना आणि भूस्खलनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गोहर उपविभागातील काशान गावातील भूस्खलनाच्या घटनेत एका कुटुंबातील आठ जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर बागी नाला येथे अचानक आलेल्या पुरामुळे पाच जण बेपत्ता झाले आहेत. चंबा जिल्ह्यातील बनेत गावात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या जिल्ह्यातील थुनाग परिसरात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कुल्लू आणि मंडीच्या उपायुक्तांनी अंगणवाडी केंद्रांसह सर्व शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. मंडी कटौला पराशर रस्त्यावरील बागी नाल्यातील ढगफुटीमुळे आलेल्या महापुराने जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे.

हेही वाचा:

Back to top button