Earthquake : उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के | पुढारी

Earthquake : उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील लखनौ आणि सीतापूर जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री १ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ही ५.२ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू लखनौच्या उत्तर-ईशान्य भागात १३९ किलोमीटर, ८२ किमी खोलीवर होता. यापूर्वी उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्येदेखील भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राने दिली आहे.

येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे झोपेत असलेले नागरिक खडबडून जागे झाले. हे धक्के जाणवताच घरातील लोक बाहेर धावत आले. ते सांगतात की, भूकंपाचा हादरा इतका जोरदार होता की, घरांमधील वस्तू काही काळ हादरत होत्या. या घटनेनंतर येथील नागरिक रात्री उशिरापर्यंत जागेच होते. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. या धक्क्यांमुळे नागरिकांच्यात भीतीने वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

याआधी उत्तराखंडच्या पिथौरागढ भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. हा भूकंप ३.६ रिश्टर तीव्रतेचा होता. तसेच यापूर्वीही जम्मू-काश्मीरमधील हेनले गावाच्या दक्षिण-नैऋत्येस ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा:

Back to top button