Vaishno Devi Yatra : मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित | पुढारी

Vaishno Devi Yatra : मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू- काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा डोंगरावरील वैष्णोदेवी (Vaishno Devi Yatra) यात्रा  मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थितीमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. श्री माता वैष्णोदेवी देवी श्राइनबोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेल नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कटरा या यात्रेकरूंच्या आधार शिबिरात संध्याकाळी अनेक तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून कटरा ते भवन हा प्रवास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मुसळधार पाऊस सुरू झाल्याने मध्यरात्रीपर्यंत हजारो यात्रेकरू मंदिरात होते. भवन परिसरात असलेल्या, श्राइन बोर्ड कर्मचारी, पोलिस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या कडक देखरेखीखाली सांझीचट्ट आणि नंतर कटरा येथे येणाऱ्या यात्रेकरूंवर लक्ष देण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन संघ आणि वैद्यकीय युनिट्स कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सतर्क ठेवण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?

Back to top button